
संभाजी ब्रिगेडची मागणी..
निलंगा (प्रतिनिधी)
राज्यांमधे मागील काही दिवसापासून पावसाने थैमान घातले असून सर्व नद्या नाल्याना महापूराचे रुप आले आहे. सगळीकडे हाहाकार आहे.नदीच्या पुरामुळे नंदिकाठचे पिक पूर्णपणे सडलेले आहे. उभ्या पिकाला कोंब फुटायला चालू झाले आहे.पुरामुळे अनेक शेतकऱ्याचे पशुधन,शेती आवाजारे शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहे. यामध्ये अनेकांचे संसार मोडले अनेकांचा संसार उघड्यावर आला. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. कोलंमडून पडला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे टाकून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करावी
अशी मागणी आमदार संभाजी पाटील – निलंगेकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्ठा करू नये सरकारणे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून भरीव मदत करावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडणे केली आहे..
निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम,जिल्हा सचिव इर्शाद शेख,सिद्धेश्वर तेलंगे,शहराध्यक्ष परमेश्वर बोधले,रमेश लांबोटे,तालुकाउपाध्क्ष सगरे गोविंद,तालुका संघटक परमेश्वर जाधव,कुणाल पाटील,भरत चव्हाण,परमेश्वर नांगरे,जावेद मुजावर,गणपतराव वरवटे,ऋषिकेश निलंगेकर,अफरोज पांढरे,हणमंत सगरे,सुभाष सूर्यवंशी,गौस शेख,शिवदास मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.