निलंगा,दि.२४
शहरातील जेष्ठ नागरिक श्रीमती सरूबाई माधवराव बिराजदार यांचे गुरुवार दि. 23 ऑक्टोबर रोजी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवर सायंकाळी 5 वाजता लिंगायत स्मशानभूमी निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी मित्र, आप्तेष्ट ,नातेवाईक, व्यापारी, शिक्षक , पत्रकार, विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मयत सरूबाई बिराजदार यांच्या पक्षात दोन विवाहित मुली, तीन मुले, सुना नातवंडे, असा परिवार आहे
श्रीमती सरूबाई बिराजदार या शिक्षक, पत्रकार श्रीशैल बिराजदार यांच्या आई होत. शुक्रवारी दि.24 ऑक्टोबर रोजी सकाळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शिक्षक कॉलनी येथील त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.