निलंगा,दि.२४.(मिलिंद कांबळे)
देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. डॉ. भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका मनुवादी वकीलाने बूट फेकून केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निलंगा शहरात संविधानप्रेमी नागरिकांनी मूक मोर्चा काढून जाहीर निषेध नोंदविला.
संविधान, न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर आधारित देशात सरन्यायाधीशांवर झालेला हा प्रकार भारतीय न्यायव्यवस्थेवरचा व संविधानावरचा थेट हल्ला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे देशाची मान जागतिक पातळीवर शरमेने झुकली असल्याचे उपस्थित नागरिकानी सांगितले.
संविधानप्रेमी व आंबेडकरवादी जनतेने आज दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी “मूक मोर्चा” काढून उपविभागीय अधिकारी, निलंगा यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, मनुवादी वकील राकेश किशोर तिवारी याने डॉ. भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून केलेले कृत्य देशद्रोहासमान असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व न्यायालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोर्चाच्या शेवटी नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून सरन्यायाधीशांविषयी ऐक्य व समर्थन व्यक्त केले.
संविधानप्रेमींचा स्पष्ट इशारा
“डॉ. गवई यांच्यावरचा हल्ला म्हणजे न्याय व समतेच्या तत्त्वांवर प्रहार आहे.
संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही!”
यावेळी ॲड. जे.बी.सूर्यवंशी (दादा), रजनीकांत कांबळे, विलास सुर्यवंशी, वामन कांबळे, विजयकुमार सुर्यवंशी, दाजीबा कांबळे,अंकुश कांबळे, देवदत्त सुर्यवंशी, गिरीश पात्रे, रोहन सुरवसे, साहेब कांबळे, अरविंद कांबळे, बंटी कांबळे, प्रकाश कांबळे आदी प्रमुख कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी होते, या वेळी कॉंग्रेस पक्षाचे अभय साळुंके, अजित माने, हमीद शेख, यांनी निषेध नोंदवून मोर्चास पाठिंबा जाहीर केला.