
लातूर, दि. 06(मिलिंद कांबळे )
मौजे कासार शिरशी ता. निलंगा जिल्हा लातूर येथील सौ. सुषमा सबनीस लवंद यांनी इंग्रजी विषयातील सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
कासार शिरसी येथील ग्रामीण भागात जन्माला येऊन जिने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करत स्वतःचा प्रपंच सांभाळत ज्ञानार्जनासह ज्ञानदानाचे महान कार्य करत या रणरागिनीने 15 जून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत इंग्रजी विषयातून घवघवीत यश संपादन केले तिच्या या यशाबाबत येथील सर्व शैक्षणिक संस्थेतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
भूतपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सर्वश्री श्रीपाल जी सबनीस यांच्या सुनबाई असलेल्या सौ. सुषमा वैभव सबनीस स्वतःच्या घराण्यातील साहित्य परंपरा जपत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून डॉक्टर पदवी प्राप्त केली असून आत्तापर्यंत त्यांची अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळी वर प्रकाशित झाले आहेत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात आणि परिषदेमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत तिच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कासार शिरशी स्तरातून सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.