निलंगा,दि.११
निलंगा तालुक्यातील हाडगा येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने एक दिवसासाठी शाळेचे प्रशासन विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध पदांवर कामकाज सांभाळत शाळेचे दैनंदिन व्यवस्थापन सुरळीतपणे पार पाडले.
या दिवशी पृथ्वीराज वाघमारे यांनी मुख्याध्यापक, नम्रता कळसे यांनी उपमुख्याध्यापक तर ईश्वरी वाघमारे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.आकांक्षा वाघमारे व ज्योती कोदळे यांनी सेवक म्हणून कामकाज पाहिले. स्वयंशासन दिनाचे महत्त्व पृथ्वीराज वाघमारे व ईश्वरी वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
शिक्षकांच्या भूमिकेत हनुमंत, देवराज, वेदांत, चैतन्य, सोनेराव, कार्तिक, विश्वजीत, जानवी, तनुजा, मोक्षदा, श्रद्धा, अंकिता, कन्हैया, साक्षी, आदिती, नंदिनी, कल्याणी, आरती, समीक्षा, मयुरी, श्रावणी, अंजली, संध्याराणी, ज्योती व शीतल या विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये अध्यापनाचे कामकाज पार पाडले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक डी. आर. दिवे यांच्यासह राजेश मंदाडे, राजश्री भिसे, विद्यामती पांचाळ, कौशल्या कांबळे, कल्पना लामतुरे व अंजना बरेवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी नवनियुक्त पंचायत समिती सदस्या शिल्पा परमेश्वर शिंदे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी वाघमारे व अंकिता वाघमारे या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि प्रशासनाची समज विकसित होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले…