निलंगा, दि. 22
तळीखेड (ता. निलंगा) येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक यंदा पूर्णपणे बिनविरोध पार पडली. विद्यमान चेअरमन मनोज व्यंकटराव पाटील आणि खादी ग्रामोद्योग मंडळाचे चेअरमन दगडूजीराव सोळंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला तळीखेड, सावनगिरा, म्हसोबावाडी आणि गुऱ्हाळ या चारही गावांतील शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला.
गेल्या अनेक वर्षांपासून मनोज पाटील यांनी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचे लाभ पोहोचवले आहेत. त्यांच्या कामकाजावर समाधान व्यक्त करून मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणतीही स्पर्धा न होता शांततेत पूर्ण झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी एस. एन. किलचे यांनी आज अधिकृतपणे संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली.
नवीन संचालक मंडळात मनोज व्यंकटराव पाटील, दगडू भिकाजी सोळुंके, व्यंकट बाबुराव जाधव, गोविंद कामाजी सुरवसे, शहाजी म्हादा भोसले, दयानंद माणिकराव जाधव, ललिता अशोक पाटील, लताबाई सुभाष सोळंके, जयशंकर शिवराज हत्ते, कमलाकर विनायकराव पाटील, धनाजी गणपती शेरीकर, कांत वसंत जाधव आणि रंजना अभिमन्यू सोळंके यांचा समावेश आहे.
गावकऱ्यांनी व शेतकरी बांधवांनी या बिनविरोध निवडीचे स्वागत करत नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.