
भिक्खु पय्यानंद थेरो
लातूर,दि.04(मिलिंद कांबळे
मौर्य आणि सातवाहन काळात वर्तमान तेर नगरीचे प्राचीन तगर हे नाव होते.तेर नगरीचा मूळ प्राचीन इतिहास हा बौध्द धम्माचे केंद्र म्हणून इतिहासात ओळखले जाते.
सम्राट अशोकाने तथागत बुध्दाच्या शरीर अस्थी धातूचे चैत्य ( करंडक ) जम्बूद्विपातील प्रमुख शहरामध्ये प्रतिस्थापित केले होते.
प्राचीन काळी तेर हे गाव आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध बाजार पेठ होते. तेर येथे सापडलेले बौध्द चैत्य आणि त्रिविक्रम पुरातन वास्तू ही बौध्द धम्माची साक्ष आहे. त्यामुळे तेर नगरी बौध्द समाजाची चैत्य भूमी असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले.
ते प्रत्येक रविवार चलो बुध्द विहार अभियान, लातूर अंतर्गत भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शना खाली तेर येथील उत्तखनन झालेल्या प्राचीन पावन बौध्द चैत्य स्तूपाच्या प्रत्यक्ष सानिध्यात सामूहिक बुध्द वंदना,चैत्य पूजा, ध्यान, परित्राण आणि धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन रविवार रोजी करण्यात आले होते. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक ध्यान साधनेने झाली. त्यानंतर उपस्थित पूज्य भिक्खु संघाने त्रिरत्न वंदना परित्राण सूत्रपठण केले.
या प्रसंगी भंते पय्यानंद थेरो बोलताना पुढे म्हणाले की, तेर प्राचीन काळात मोठे सुसज्ज शहर होते. सातवाहन राजा वाशिष्टी पुत्र पुलूमावी यांच्या काळातील प्रांतिक उपराजधानी दर्जा तेर प्राप्त होता.सम्राट अशोकाने याठिकाणी बुध्दाचा अस्थी धातू चैत्य प्रतिस्थापित करून तेर नगरीचे वैभव वाढविले होते.उत्तखननात सापडलेल्या बौध्द चैत्यामुळं तेर जगाच्या दृष्टीक्षेपात आले आहे.
त्यामुळे परिसरातील तमाम बौध्द बांधवानी आपल्या परिवारा सहित तेर येथील बौध्द चैत्य स्तूपास भेट द्यावी असे आवाहान ही भंतेजी यांनी धम्म देशनेत केले. यावेळी कार्यक्रमास अतिथी म्हणून माजी सभापती कैलाश शिंदे, बौध्द विचारवंत डॉ. कमलाकर कांबळे, माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत भारतीय बौध्द महासभेचे राजेंद्र निकाळजे इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून सरपंच दीदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,सुहास सरोदे, सुमेध वाघमारे,आशा चिकटे, गुणवंत सोनवने,डॉ. दुष्यंत कटारे, प्रा. देवदत्त सावंत, सुशील चिकटे,अनिल हजारे,रमेश गायकवाड इत्यादी होते.याप्रसंगी पू. भिक्खु धम्मसार, भंते बोधीराज,आर्या मेत्ता यांचीही धम्म देशना संपन्न झाली. कार्यक्रम यशस्वीते साठी मिलिंद धावारे, अनिरुध्द बनसोडे, करण ओहळ, उदय सोनवने, इत्यादीनी परिश्रम घेतले.
यावेळी कार्यक्रमास विजय गायकवाड, पांडुरंग अंबुलगेकर,निवृत्त मागासवर्गीय कर्मचारी संघचे अरुण बनसोडे, अशोक बनसोडे, दिलीप वाघमारे, यू. व्ही. माने, सुनील बनसोडे, विजय गायकवाड, प्रभाकर बनसोडे, प्रा. महेंद्र चंदनशिवे, बाळासाहेब माने, रवींद्र कांबळे, नितीन सोनवणे रमेश कांबळे, संपत शिंदे, ए. एन. उबाळे, बलभीम कांबळे, प्रा. राम शिंदे,
कुंदन चिलवंत, सुशांत सोनवणे, अमरशक्ती चिलवंत, सात्यपाल वाघमारे, छत्रपाल वाघमारे, अक्षय शिंगाडे, अनुज झेंडे,राजगीर वधुवर सूचक मंडळ चे रमेश कांबळे, संपत शिंदे, ए. एन. उबाळे, बलभीम कांबळे, प्रा. राम शिंदे, छत्रपाल वाघमारे,
लातूर,धाराशिव, नांदेड, जिल्ह्यातील बौध्द उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.