पंचशीलाचे पालन हेच मानवाच्या दुःखमुक्तीची गुरुकिल्ली आहे.
भंते महावीरो थेरो
लातूर,दि.२५ (मिलिंद कांबळे)
प्रत्येक मानवाने पंचशीलाचे पालन करणे हीच मानवाच्या दुःखमुक्तीची गुरुकिल्ली आहे. जे लोक संकटात सापडतात त्या लोकांचे दुःख जाणून त्या लोकांना पंचशीलाचे पालन करण्याचा योग्य मार्ग दाखवणे हाच धम्माचा खरा उद्देश आहे. असे प्रतिपादन भंते महाविरो थेरो यांनी केले. ते बुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार पर्वा निमित्त वैशाली बुद्ध विहार बौद्धनगर लातूर येथे रविवार दि.२४ रोजी उपासक-उपासिकांच्या संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प, पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना भंते महाविरो थेरो पुढे म्हणाले की, मानवाचा स्वतःच्या कर्मावर विश्वास असावा लागतो म्हणून लोकांनी हिंसा, चोरी,असत्य, बोलणे या हानीकारक असणाऱ्या विकारापासून दूर राहणे गरजेचे आहे. विश्वाच्या सुखाचा आधारच पंचशील आहे. लोकांना दुःखमुक्त करणे हा धम्माचा उद्देश आहे. शत्रू – शत्रूचे जेवढे वाईट करीत नाहीत तेवढं वाईट आपले वाईट कर्म करीत असतात. चांगल्या मार्गावरच आपलं मन आपल्या आई वडील व नातलगा पेक्षाही अधिक कल्याण करीत असते म्हणून धम्म आचरणाने मन निर्मळ करा उत्साह अमृताचे साधन आहे. तर आळस मृत्यूचे कारण आहे. दुःखात पडलेल्यांना जागृत करणे हेच धम्माचे काम आहे.जगावर प्रभुत्व गाजवण्यापेक्षा स्वतःवर नियंत्रण मिळवा असा उपदेशही भंते महाविरो थेरो यांनी केले.यावेळी आशा बानाटे यांनी भोजनदान दिले तर लता कांबळे यांनी खिरदान दिले.यावेळी दिक्षाराणी खटके, लता चिकटे, लता गायकवाड, त्रिशला क्षिरसागर सुशीला अजनीकर, सुनिता सावंत,नंदा सरवदे , गंगाबाई भागवत, सुनीता गायकवाड, सूर्यभान लातूरकर, राजू कांबळे,दामू कोरडे, उत्तम गायकवाड, हरिश्चंद्र सुरवसे, उत्तमराव कांबळे, कुमार सोनकांबळे, आदी उपासक उपासिका शिबिरास मोठ्या संख्येनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केशव कांबळे यांनी केले. तर आभार सूर्यभान लातूरकर यांनी मानले…
मिलिंद कांबळे
दैनिक वृत्तरत्न सम्राट जिल्हाप्रतिनिधी लातूर
मो.9960049411
Email: milind.kamble9960@gmail.com