लातूर,दि.22
लातूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना निलंबित करण्यात आल्याने रिक्त जागेवर तृप्ती अंधारे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेले नागनाथ शिंदे यांनी यापूर्वी बीड येथे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत असताना आपल्या अधिकाराचा गैर वापर करून वैयक्तिक मान्यता यासारख्या कांही प्रकरणात अनियमितता केली, यावरून तक्रार नमूद करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ स्तराबर तक्रारीची दखल घेऊन नागनाथ शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.सदर निलंबन झाल्यामुळे रिक्त जागेवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी शिक्षण विभागात अनेक दिवसांपासून कार्यरत असलेल्या तृप्ती अंधारे यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सोपवला आहे.