निलंगा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांची निलंगा येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अरविंद पाटील निलंगेकर यांनी निवेदन स्वीकारून शिष्टमंडळाशी चर्चा केली तसेच शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.
शिक्षक हे समाजाला घडविणारे शिल्पकार असून, त्यांच्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेचा विषय संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी संघाचे उमेश पाटील, एन.एच. गिरी, एस.एम. पाटील, एच.आर. हाणेगावे, एच.एम. पटेल, एस.एस. वतने, डी.आय. नरवने, एस.के. कामठाणे, एस.व्ही. दूधभाते, एम.एस. नांगरे, एस.पी. लादे, डी.बी. मुळे, बी.एम. चपटे, ए.बी. सरतापे, एन.जी. पाटील, प्रभाकर बरमदे, जी.एम. काळे, के.एम. होसुरे, जाधव, यु.जी. गव्हाणे, जी.जे. सपकाळे, आर.एन. क्षीरसागर, आर.डी. बिराजदार, पी.पी. गंगभडे, डी.बी. आकडे, एन.व्ही. एवते, बी.ए. वांजरवाडी, ए.आर. पांचाळ, बी.बी. सोळुंके, सोनाली पाटील, एन.आर. मातने, बी.एस. कदम, आय.व्ही. कोकरे, दीपक रबशेटे, आर.व्ही. बोळे आदींसह संघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.