शहीद श्रीधर चव्हाण आयटीआय व महाराष्ट्र विद्यालय निलंगा यांच्यावतीने राष्ट्रगीताच्या १५० वर्षानिमित्त भव्य सामूहिक गायन**
निलंगा (प्रतिनिधी) – “वंदे मातरम” राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त निलंगा शहरात देशभक्तीचा अविष्कार घडला. शहीद श्रीधर चव्हाण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) निलंगा व महाराष्ट्र विद्यालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य कार्यक्रमात तब्बल २९०० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या ‘वंदे मातरम’ गायन करून देशप्रेमाचा अद्वितीय संदेश दिला. संपूर्ण विद्यालय परिसर राष्ट्रगीताच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री उमाकांत होनराव (रिलायन्स कॉलेज, लातूर), उपजिल्हाधिकारी श्री झाडके, तहसीलदार श्री कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री स्वामी, आयटीआयचे प्राचार्य श्री राजुरकर, आयएमसी सदस्य श्री किशोर पोतदार, श्री शिवशंकर मिरगाळे, श्री पांढरे सर, तसेच महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवर्ग, व निलंगा शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या गाताना संपूर्ण वातावरण राष्ट्रभावनेने भारावले. या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये राष्ट्रीय एकता, स्वातंत्र्याचा अभिमान व भारतीय संस्कृतीबद्दलची निष्ठा दृढ करण्यात आली.