लातूर,दि. 22
शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते पीव्हीआर टॉकीजकडे जाणाऱ्या रिंगरोडवर रस्ता अडवून मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी रात्री आठ तरुणांनी रिंगरोड अडवून आसपासच्या नागरिकांना त्रास होईल असा आरडाओरडा करून शांततेचा भंग करणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई यामध्ये मयूर मारुती कावळे, वय 21 वर्ष,आदित्य लक्ष्मण देशमुख, वय 21 वर्ष, दोघे राहणार खाडगाव रोड, लातूर,गौरीशंकर शिवमूर्ती दरेकर, वय 22 वर्ष, राहणार सलगरा खुर्द तालुका जिल्हा लातूर,श्रीकृष्ण राजाभाऊ बोराडे, वय 21 वर्ष, राहणार येळी तालुका लातूर, समर्थ नवनाथ श्रीराम, वय 20 वर्ष, सुदर्शन लक्ष्मण फुलगमवार, वय 21 वर्ष, राहणार नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड,कृष्णा राजाराम ताटेवाड, वय 21 वर्ष, राहणार नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड,अजय बनसिंग भुजबळ, वय 21 वर्ष राहणार जोडजोवळा तालुका लातूर. यांचा समावेश आहे.सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलिस अमलदार मोहन सुरवसे, राहुल कांबळे यांनी केली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन येते की—वाढदिवस,पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ, डान्स पार्टी, साऊंड लावणे, फटाके फोडणे, रस्ता बंद करणे अशी कृत्ये कायद्याने दंडनीय आहेत.सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यास मनाई आहे.नागरिकांनी अशा प्रकारची गडबड व बेकायदेशीर कृत्ये केल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष ०२३८२_२४२२९६ /११२ वर संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. असे आवाहन केले आहे.