डॉ. सदानंद कांबळे यांचा समाजवादी शिक्षण हक्क सभेकडून गौरव
लातूर, दि.२७
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक डॉ. सदानंद कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध वैद्यकीय शास्त्र विभागाच्या राज्यस्तरीय परीक्षेत पुरुष गटात राज्यात प्रथम क्रमांक, तर संयुक्त गुणवर्गात तृतीय क्रमांक मिळवत लातूरचा झेंडा उंचावला आहे.
एमपीएससीमार्फत २४ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आलेल्या सहयोगी प्राध्यापक पदाच्या परीक्षेचा निकाल २० नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. निकालात डॉ. कांबळे (एम.डी.) यांनी मिळवलेले यश राज्यात सर्वाधिक ठरले, तर त्यांच्या विभागासाठीही हा ऐतिहासिक क्षण म्हणून नोंदला जात आहे.
संविधान स्वीकृती दिनानिमित्त अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभा – लातूर जिल्हा शाखेतर्फे डॉ. कांबळे यांचा शॉल, विचारशलाका ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन मानाचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार राज्य उपाध्यक्ष रामकुमार रायवाडीकर यांच्या हस्ते पार पडला.
डॉ. कांबळे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. डॉ. सुशीलाताई पिंपळे, उत्तरेश्वर बिराजदार, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, प्रा. डॉ. अनिल जायभाये, शाम वरयानी, बाळ होळीकर, संजय व्यवहारे, शिवाजीराव पिटलेवाड, गणपतराव तेलंगे, डी.व्ही. वाघमारे, गोपाळतात्या चिकाटे, माधवराव गायकवाड, प्रा. रामकिशन समुखराव, प्रा. डॉ. डी.टी. घटकार, शिवाजीराव गायकवाड चिखलीकर, अंगरदराव कांबळे, अनिरुद्ध वाघमारे, अरुण गवळी, कबीर रायवाडीकर, पंचप्पा स्वामीगुरुजी, ऍड. डी.एन. भालेराव, अंकुशराव कांबळे, बाबा शेख, पांडुरंग देडे, दिगंबर सुर्यवंशी, वलीसाहेब शेख आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.