निलंगा,दि.२७
भारतीय बौद्ध महासभा, लातूर पश्चिम जिल्हा, निलंगा तालुकाअंतर्गत कासार बालकुंदा येथे दि. २६ ऑगस्ट रोजी महिला ग्राम शाखेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त महिला समता सैनिक शिबिरही उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन, त्रिशरण व पंचशील ग्रहणाने झाली. कर्नाटक येथील समता सैनिक दलाच्या अधिकारी व प्रशिक्षकांनी महिलांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला जिल्हाध्यक्षा आयु. नी. शारदाताई हजारे यांच्या हस्ते महिला ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस आयु. नी. वंदनाताई कांबळे, उपाध्यक्ष संरक्षण आयु. नी. मंगलताई सुरवसे, तालुका अध्यक्ष बी. आर. गायकवाड, विशाल गायकवाड, अनिल गाडे, अंकुश गायकवाड यांच्यासह उपासक-उपासिका व महिला उपस्थित होत्या. नव्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शाखेच्या अध्यक्षपदी आयु. नी. राधिकाताई गोपाळे, सरचिटणीसपदी आयु. नी. वनमालाताई मधाळे व कोषाध्यक्षपदी आयु. नी. नीताताई मधाळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधाळे सर यांनी केले. शेवटी सरणाताई गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.