एच. एस. लकी
निलंगा,दि.११
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आगामी काळात महिला व तरुणांना अधिक संधी देणार असल्याचे काँग्रेसचे निरीक्षक एच. एस. लकी यांनी सांगितले.
निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित संगठन सृजन अभियानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, देशात बदल घडविण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. तसेच स्वर्गीय राजीव गांधी यांनी महिलांना राजकारणात संधी दिली होती, त्याच धोरणावर काँग्रेस काम करणार आहे.
लातूर जिल्ह्याच्या विकासात विलासराव देशमुख, शिवराज पाटील आणि डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गटबाजी विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बैठकीस विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.