अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्था “Society for the Advancement of American Philosophy (SAAP)” यांनी जागतिक व्यवहारवाद (Global Pragmatism) आणि तत्त्वज्ञान विषयातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी Dr. B. R. Ambedkar यांच्या नावाने “Dr. B.R. Ambedkar Award USA” या विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे.
हा पुरस्कार सामाजिक न्याय, मानवाधिकार, समता आणि लोकशाही मूल्यांवर आधारित संशोधन व कार्य करणाऱ्या विद्वानांना प्रदान करण्यात येणार आहे. अमेरिकेसारख्या देशात बाबासाहेबांच्या विचारांना मिळणारी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी मान्यता मानली जात आहे.
Dr. B. R. Ambedkar यांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा संदेश आज संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव आता जागतिक शैक्षणिक आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातही अधिक दृढ होत असल्याचे या पुरस्कारामुळे स्पष्ट झाले आहे.
आंबेडकरी समाजासह भारतातील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अभिमान व्यक्त केला आहे.