लातूर,दि.०७
उदगीर ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२९ एप्रिल २०२६ रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तथागतनगर येथे झालेल्या घरफोडीचा तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींकडून उदगीर, चाकूर, पालम (जि. परभणी) तसेच कर्नाटक राज्यातील बिदर परिसरातील एकूण ९ घरफोड्यांची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींकडून ५ तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चोरीसाठी वापरण्यात आलेला ऑटो (MH-24 E 8044) व हत्यारे असा एकूण १ लाख ३३ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत त्यात १) बळीराम विश्वनाथ कुसळकर (रा. नांदेड) २) अनिल सीताराम चव्हाण (रा. हिंगोली) ३) हणमंत बाबू पवार (रा. नांदेड) ४) पिराजी हरिश्चंद्र कुसळे (रा. लातूर)
ही कारवाई पोलीस अधीक्षक लोकेश कणसे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांच्या पथकाने केली.
या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.